तळोदा l प्रतिनिधी
तालुक्यातील मोरवड येथे उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली असून उपसरपंच पदी ज्योती रणजित चौधरी यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक गट विकास अधिकारी बी.के पाटील यांनी जाहीर केले.
दिनांक १३ नोव्हेंबर २०२२ रोजी मोरवड येथील ग्रामपंचायत कार्यालयात ठीक दहा वाजता सरपंच अनिता प्रवीण वळवी यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून बी.के. पाटील व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून एन.एच.शेख यांनी काम पाहिले यावेळी सरपंचासह ज्योतिबाई रंजीत चौधरी, गीताबाई सुभाष पाटील, मंदा प्रवीण वळवी,उषा मनोहर ठाकरे,वर्षाबाई सुरज ठाकरे, उषा रतिलाल पाडवी, प्रवीण बुलेसिंग वळवी,संजय वसंत पाडवी, विकास राजू पाडवी व सर्व सदस्य उपस्थित होते.
उपसरपंच पदासाठी ज्योतीबाई रंणजीत चौधरी यांचा एकमेव अर्ज आल्याने ज्योतीबाई रंणजीत चौधरी यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले.
यावेळी माझी जि.प. सदस्य जितेंद्र पाडवी, चौधरी, सुभाष चौधरी, वासू पाडवी,प्रेम पाडवी सह ग्रामस्थ उपस्थित होते. निवडणूक बिनविरोध झाल्याने सरपंच व उपसरपंच यांचे सर्वांनी अभिनंदन केले.








