Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर पोलिसांनी केला आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

team by team
November 13, 2022
in क्राईम
0
नवापूर पोलिसांनी केला आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

नवापूर  | प्रतिनीधी

नवापूर पोलीस ठाणे हद्दीतुन चोरीस गेलेल्या सुमारे १ लाख ३० हजाराच्या ३ मोटार सायकली ४ संशयीतांकडुन नवापूर पोलीसांनी हस्तगत केल्या आहेत.याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, ८ ऑक्टोंबर रोजी रात्री नवापुर तालुक्यातील लक्कडकोटयेथील केवलसिंग अर्जुनसिंग सोलंकी यांची ५० हजाराची (क्र.जी. जे. २६ ओ. डी. ०१०७ ) दुचाकी, ९ ऑक्टोंबर  रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नवापुर शहरातील देवळफळी भागातुन चिराग प्रकाश गावीत यांची ५० हजाराची दुचाकी (क्र.जी. जे. २६ एम. ४४३४) तसेच ४ ऑक्टोंबर रोजी रात्री शहरातील रेल्वे स्टेशन भागातील गरबा मंडळाचे जवळ  श्याम पंडीत गोसावी यांच्या मालकीची ३० हजाराची दुचाकी ( क्र. जी. जे.१९,एफ.५४६६) अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने नवापूर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील आदेशाने नवापुर पोलीस ठाण्याचे पालीस निरीक्षक निलेश वाघ यांनी पथक तयार करुन त्यांना सुचना देवुन रवाना केले.

 

 

 

 

 

त्यानंतर निलेश वाघयांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, संशयीत आरोपी शाहरुख ऊर्फ चेंडु मुख्तार काकर रा.मगधुमनगर, ता. जि. व्यारा,  गुजरात याने लक्कडकोट येथील केवलसिंग अर्जुनसिंग सोलंकी यांचीमोटार सायकल चोरी केली असुन.तो पुन्हा दुसर्‍या मोटार सायकली चोरी करण्याचे बेतात असुन लक्कडकोट परिसरातसंशयास्पदरित्या फिरत असल्या बाबत माहिती मिळाल्याने. निलेश वाघ यांनी लागलीच पोलीस उपनिरीक्षक मनोजपाटील, अ.स.ई. गुमानसिंग पाडवी, हवालदार नरेंद्र नाईक, पोलीस नाईक प्रविण मोरे, पोलीस शिपाई प्रशांतखैरनार, रणजित महाले, श्याम पेंढारे यांच्या पथकाला पाठवले. पथकानेसापळा रचुन संशयीत आरोपी शाहरुख ऊर्फ चेंडु मुख्तार काकर यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता नमुद आरोपी याने सदरची मोटारसायकल चोरी केल्याचे कबुल करुन ती त्याचे ओळखीचा शोएब अमिन शाह  रा.ईस्लामपुरा, ता.नवापुर यांस विक्री केली असल्याचे कबुल केले. त्याअनुषांगने पोलीस अधिकारी व अंमलदारयांनी ५० हजाराची दुचाकी शोएब अमिन शाह यांच्या कडुन हस्तगत करीत त्याला अटक केली.

 

 

 

 

त्यानंतर निलेश वाघ यांना बातमी मिळाली की, संशयीत आरोपी जमिल ऊर्फ सपान खलील शेख रा.ईस्लापुरा, नवापुर याने चिराग प्रकाश गावीत,  श्याम पंडीत गोसावी यांची मोटार सायकली चोरी करुन त्याचा मित्र मोहंमदआकीब ऊर्फ बाबा जैनुद्दीन शेख रा.राम रहिम चौकी, चिरागअली मोहल्ला, नंदुरबार, यासविक्री केली असुन तो पुन्हा दुसर्‍या मोटार सायकली चोरी करण्याचे बेतात असुन नवापुर शहरातील लाईट बाजारपरिसरात संशयास्पदरित्या फिरत असले बाबत माहिती मिळाल्याने निलेश वाघ यांनी लागलीच पोलीस उपनिरीक्षकअशोक मोकळ, अ.स.ई.विकास पाटील, अ.स.ई. युवराज परदेशी, हवालादर दादाभाई वाघ, नितीन नाईक,दिनेशकुमार वसुले, पोलीस नाईक योगेश थोरात, पोलीस शिपाई सुनिल बर्वे, पंकज सुर्यवशी, विक्की वाघ यांचे पथक पाठवले.पथकाने सापळा रचुन संशयीत आरोपी जमिल ऊर्फ सपान खलील शेख यासताब्यात घेवुन विचारपुस केली असता सदरच्या मोटार सायकल चोरी केल्याचे कबुल करुन ती त्याच्या ओळखीचा मोहंमद आकीब ऊर्फ बाबा जैनुद्दीन शेख यास विक्री केली असल्याचे कबुल केले.

 

 

 

 

त्याअनुषांगने पोलीसअधिकारी व अंमलदार यांनी लागलीच सुमारे ५० हजाराची व ३० हजाराची  या दोन दुचाकी  मोहंमद आकीब ऊर्फ बाबा जैनुद्दीन शेख याच्या कडुन जप्त करीत त्याला अटक केली. एकुण ४ आरोपी यांच्या कडुन सुमारे १ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या ३ मोटार सायकली जप्त करण्यातआल्या आहेत.सदरची कारवाई अधीक्षक  पी. आर. पाटील, विभागाचे उपविभागिय पोलीस अधिकारी  विश्वास वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली नवापुर पोलीस ठाण्याचेे प्रभारीअधिकारी  निलेश वाघ, मनोज पाटील, अशोक मोकळ, अ.स.ई.गुमानसिंग पाडवी, अ.स.ई. विकासपाटील, अ.स.ई. युवराज परदेशी, हवालदार नरेंद्र नाईक, हवालादर दादाभाऊ वाघ, नितीन नाईक, दिनेशकुमार सु.वसुले, पोलीस नाईकयोगेश थोरात, प्रविण मोरे, पोलीस शिपाई प्रशात खैरनार, रणजित महाले, श्याम पेंढारे, सुनिलबर्वे, पंकज सुर्यवशी, विक्की वाघ यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

रांझणी शेत शिवारातून जलपरी मोटार लंपास

Next Post

शहादा येथे जनजातीय गौरव दिनानिमित्त 800 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी

Next Post
शहादा येथे जनजातीय गौरव दिनानिमित्त 800 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी

शहादा येथे जनजातीय गौरव दिनानिमित्त 800 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add