नंदुरबार
अक्कलकुवा तालुक्यातील डिगीआंबा येथील शेत शिवारातून चोरट्याने २५ हजार रुपये किंमतीची जलपरी मोटार चोरुन नेली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील रांझणी येथील केसरसिं जवानसिंग वळवी यांचे अक्कलकुवा तालुक्यातील डिगीआंबा येथील शेत शिवार सर्व्हे क्र.७/२ मध्ये शेत सदर शेतातून चोरट्याने २५ हजार रुपये किंमतीची ३ हॉर्स पॉवरची जलपरी मोटार चोरुन नेली.
याबाबत केसरसिंग वळवी यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.सुनिल पवार करीत आहेत.








