शहरातील गणेश नगरात चोरट्याने घरफोडी सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील शेख अख्तर शेख अमीर पिंजारी यांचे कोरीट रस्त्यावरील गणेश नगरात घर आहे.
सदर घराच्या संडासाच्या खिडकीचे गज वाकवून चोरट्याने घरात प्रवेश केला. यावेळी घरातील बॉक्स पलंगमध्ये असलेल्या लोखंडी पेटीतील १ लाख ६६ हजार रुपये किंमतीचे ५५ ग्रॅम सोन्याचे दागिने, १४ हजार रुपयांची रोकड व दोन हजार रुपये किंमतीचे लेडीज व जेन्टस ड्रेस असा एकूण १ लाख ८२ हजाराचा ऐवज चोरुन नेला.
याबाबत शेख अख्तर शेख अमीर पिंजारी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३८०, ४५४, ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक देविदास सोनवणे करीत आहेत.








