नंदूरबार l प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या शाळेची खिडकी तोडुन चोरट्यांनी टिव्ही चोरुन नेल्याची घटना तिनसमाळ येथे घडली. याप्रकरणी अनोळखीविरुध्द धडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धडगांव तालुक्यातील तिनसमाळ येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेचा वर्गाचे पुर्वेकडील खिडकीचे गज तोडुन चोरट्याने आत प्रवेश केला. यावेळी वर्गातुन 9 हजार रुपये किंमतीचा टिव्ही चोरुन नेला आहे. याबाबत मंगेश राज्या पाडवी यांनी धडगांव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखीविरुध्द भादंवि कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना. शशिकांत वसईकर करीत आहेत








