नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य अनंता नायक हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
श्री.नायक यांचा दौरा असा : मंगळवार 15 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 4 वाजता सुरत येथुन मोटारीने नंदुरबारकडे प्रयाण. सायंकाळी 8 वाजता नंदुरबार येथे आगमन व मुक्काम. (शासकीय विश्रामगृह,नंदुरबार )
बुधवार दि. 16 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 9 वाजता स्वंयसेवी संस्था आणि आदिवासी समाजाचे नेते यांचे समवेत बैठक. सकाळी 10.30 वाजता नंदुरबार जिल्हा प्रशासकीय अधिकारी यांचे समवेत आढावा बैठक. दुपारी 1 वाजता राखीव. दुपारी 2.30 वाजता नंदुरबार येथून नाशिककडे मोटारीने प्रयाण.








