राहुल शिवदे
तळोदा l प्रतिनिधी
आगामी निवडणूकित पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल विरोधकांनी आगामी पालिकेची निवडणूक जिंकून दाखवावी असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांनी जम्बो छत्री वाटप व इतर पक्षातील कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेश सोहळा प्रसंगी केले. दरम्यान 303 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. तर 70 व्यावसायिकांना पक्षाचे चिन्ह व नेत्यांचे चित्र असलेली जम्बो छत्रीचे वाटप करण्यात आले.
तळोदा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शहरातील हातगाडी धारकांना जंबो छत्री वाटप व इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा बदरी कॉलनी परिसरात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आ. उदेसिंग पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार नरेंद्र पाडवी, मोती बँकचे अध्यक्ष निखिल तुरखीया, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस कमलेश चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष मोहन माळी, जिल्हा संघटक एन.डी. पाटील, महिला आघाडी कार्याध्यक्ष गीतांजली गावित, केशरसिंग क्षत्रिय, शोभा क्षत्रिय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अनुसूचित जाती प्रदेश नरेश पवार, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जाकीर मिया जहागीरदार, महिला आघाडी सरेखा तायडे, पुष्पा गावित, डॉ. तुषार सनसे, भालचंद्र निकम, अरविंद पाटिल, नाहोमुद्दीन खाटीक, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.रामराव आघाडी, वैद्यकीय आघाडीचे डॉ. तुषार सनसे, मोहन माळी, नितीन पाडवी, डॉ.जगदीश मराठे, केसरसिंग क्षत्रिय, विवेक पाडवी आदीं व्यासपीठावर उपस्थित होते..
यावेळी उदेसिंग पाडवी म्हणाले की, लवकरच 12 आमदारांचा निर्णय लागणार आहे. एकनाथ खडसे आमदार झाले तर मंत्री झाल्याशिवाय राहणार नाही, नाथा भाऊ व मी दोघेजण राष्ट्रवादी पक्षात एकमेकांच्या सांगण्यावरून आलो, नाथा भाऊंचे समर्थन केल्यामुळे माझे तिकीट कापले गेले, मात्र येणाऱ्या आगामी निवडणुकीत माझ्या शिवाय पर्याय नाही, विरोधकांनी आगामी निवडणूक जिंकून दाखवावी असे आव्हान केले. नाराज कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षांनी केवळ वापर केल्याचे सांगत राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रवेशित कार्यकर्त्यांनी कोणी धमकी दिली तर मा.आ. उदेसिंग पाडवी यांच्याशी गाठ आहे. हज यात्रेसाठी मिळणाऱ्या निधीच्या पत्रावर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना त्याच दिवशी सही करायला लावणार. असल्याचे ते यावेळी म्हणाले. लोकनेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त 7 हजार कुटुंबियांना घरपोहच मिठाई वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन प्रदेश उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष योगेश मराठे, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, सौ अनिता संदीप परदेशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत चौधरी, कार्यकर्ते संदीप परदेशी, केसरसिंग क्षत्रिय व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आयोजन करण्यात आला होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वरील कार्यकर्त्यांसह विकास क्षत्रिय, इम्रान शिकलीकर, आदिल शेख, कमलेश पाडवी, आसिफ शेख, धर्मराज पवार, नदीम बागवान आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश मराठे यांनी केले, प्रास्ताविक संदीप परदेशी यांनी केले.
एकनाथ खडसे यांनी भ्रमणध्वनीद्वारे उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करत प्रवेशकर्त्याना शुभेच्छा दिल्या. खान्देश पुढे गेला पाहिजे असे म्हणत आदिवासी बांधवांना न्याय मिळवुन देण्यासाठीला कार्यकर्त्यांनी जोमाने कामे केली पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करत कार्यक्रम आयोजनासाठी आभार मानले, मंत्री झाल्यावर रोकडमन हनुमान मंदिराच्या दर्शनासाठी येण्यासाठी प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांनी आमंत्रित केले लवकरच भेटीसाठी येण्याचे आश्वासन खडसे यांनी दिले.