नंदूरबार l प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील पाडली परिसरातील अनेक मोठ्या गावांना जोडणारा शिवाय अस्तंबा देवस्थानाला जोडणार-या पाडली गावातील उदय नदीवरील पुलाचे भूमिपूजन आमदार ॲड. के.सी.पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ॲड. गोवाल पाडवी, मा.जि.प.समाज कल्याण सभापती रतन पाडवी, जि.प.सदस्य सी.के.पाडवी, जि.प.सदस्य रुपसिंग तडवी, जि.प.सदस्य जान्या पाडवी, जि.प.सदस्या गिताताई पाडवी, हारसिंग पावरा,काॅग्रेसचे धडगांव तालुका अध्यक्ष रेंहज्या पावरा, जेष्ठ कार्यकर्ते सुनिल शेठ, विक्रम पाडवी ग्रा पं पाडलीच्या सरपंच ताई , उपसरपंच कालुसिंग वळवी, स.कार्यकर्ते सुरेश वळवी,पोपटा वसावे आदिसह तालुक्यातील कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाडली गावाच्या उदय नदीवरील पुलाअभावी या परिसरातील ग्रामस्थांना ऐनपावसाळ्यात धडगांव येथील तालुक्याच्या मुख्य बाजारपेठेत येण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. आमदार ॲड. के.सी.पाडवी सातत्याच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले असून सदरिल नदीवरील पुलासाठी निधी मंजुर करुन घेतला आहे. त्यामुळे पाडली परिसरातील नागरिकांनी आमदार पाडवीचे आभार मानले असून सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.
यावेळी ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या विकास कामांबाबत माहिती देत मार्गदर्शन केले. दरम्यान राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रा जनजागृती देखील करण्यात आली. व सातपुड्यातील जनतेने मोठ्या संख्येने भारत जोडो यात्रेला सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी जि.प.सदस्य तथा काॅग्रेसचे जि.प.गटनेता सी.के.पाडवी व जि.प.सदस्य रतन पाडवी यांनी देखील मत व्यक्त केले.








