नंदुरबार | प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील खडकीचा बिलजरीपाडा येथे चारित्र्याच्या संशय घेवून पत्नीचा खून केल्याप्रकरणी पती विरूध्द म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगांव तालुक्यातील खडकीचा बिलजरीपाडा येथे राहणार्या मेडया थावर्या रावतळे याने त्याची पत्नी लता मेंडया रावतळे हिचा चारित्र्याचा संशय घेवून लता रावतळे (४२) हिचा कपाळावर अनुकूचीदार दगडाने मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी दारासिंग कुवरसिंग चौधरी रा.केलापाणी ता.धडगांव यांच्या फिर्यादीवरून मेंडया थावर्या रावतळे याचा विरूध्द भादंवि कलम ३०२ प्रमाणे म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोउनि सुनिल बिर्हाडे करीत आहेत.








