Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेत जमीन हडपण्याच्या उद्देशाने घरात चोरी करून लावली आग, ६५ हजाराचे नुकसान, ९ जणाविरूद्ध गुन्हा दाखल

team by team
September 2, 2021
in क्राईम
0
नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील आंबापाणी येथे शेतजमीन हडपण्याच्या उद्देशाने जमावाने घरातील सामानाची नासधूस करीत घराला आग लावत साहित्याची चोरी केली. या आगीत दोन दुचाकींसह संसारोपयोगी साहित्य असे सुमारे ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले.याप्रकरणी  शहादा पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार,  आंबापाणी ता. शहादा येथे राहणारा वसंत रेंहज्या वळवी यांचे चुलतभाऊ टिल्या किल्या वळवी यास सुपारी देवून वसंत वळवी व त्यांच्या भावंडांनी खून केला असा आरोप करीत बिलज्या हुऱ्या वळवी, किल्या बोट्या वळवी, छगन किल्या वळवी, रमेश किल्या वळवी, सुभाष किल्या वळवी, आमश्या किल्या वळवी, पांडूरंग किल्या वळवी, रगन किल्या वळवी, मंगलेश किल्या वळवी, रगन किल्या वळवी या ९ जणांनी गाव कारभारी यांच्या सांगण्यावरुन वसंत वळवी यांच्यासह आई-वडील व भावंडांना शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. यामुळे वसंत वळवी व त्यांचे कुटूंबिय जीव वाचवून आंबापाणी गावातून पळून जात धडगाव येथे आले. मात्र आंबापाणी गावात संशयितांनी वसंत वळवी यांच्या घरात अनाधिकृत प्रवेश केला. तसेच घरातील १६ हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, ११ हजार ५०० रुपये किंमतीची ज्वारी, तुरडाळ, उडिद, चवळी, तांदुळ असे धान्य, १ हजार रुपये किंमतीचे दोन पंखे, १५०० रुपये किमंतीचे दोन सौर उर्जेचे प्लेट व दोन बॅटऱ्या असे साहित्य चोरुन नेले. तसेच घरात आग लावून नुकसान केले. या आगीत १० हजार रुपये किंमतीची दुचाकी (क्र.डी.ही.०३ ए ७६२२) व गुलाब वळवी यांची १० हजार रुपये किंमतीची दुचाकी (क्र.एम.एच.४१ बी ९२०६) या दोन दुचाकींचे नुकसान झाले. याबाबत वसंत वळवी यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात नऊ संशयिताविरोधात भादंवि कलम ४३६, ४५७, ३८०, १०९, १४३, १४७, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनिल बिऱ्हाडे करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

Next Post

अक्कलकुवा तालुक्यातील दोघा विवाहितांचा छळ

Next Post

अक्कलकुवा तालुक्यातील दोघा विवाहितांचा छळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add