नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील पूर्व भागातील गावात कोरडा दुष्काळ जाहीर करून 50 पैशांच्या आत आणेवारी लागू करावी अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे .
तालुक्यातील संपूर्ण पूर्व भागात कमी पाऊस झाल्यामुळे सर्व गावे दुष्काळग्रस्त झाली आहेत.पुरेशा पावसाअभावीशेतातील पिके जळून गेली आहेत.गावातील विहिरी तसेच तलावात पाणी नसल्यामुळे गुरा ढोरांना पिण्यास पाणी नसून गावकऱ्यांना देखील पाण्याच्या समस्यांनी ग्रासले आहे.
तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील गावांना कोरडा दुष्काळ जाहीर करावा यासाठी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख रविंद्र भरतसिंग गिरासे व जि.प.सदस्य सयाजिराव मोरे, सुरेश शिंत्रे, दीपक पाटिल सरपंच निंभेल, गजेंद्र पाटील उपसरपंच भालेर, सरपंच कार्ली सुनिल पाटील, ग्रा. प. सदस्य भादवड समाधान पाटील उपसरपंच मांजरे गणेश पाटील नींभेल व तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.








