नंदुरबार l
शहरातील एका तरुणीला बेदम मारहाण करीत अत्याचार केल्याची घटना नंदुरबारात घडली आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणातील दोन्ही अत्याचारी नराधमांवर कइोर कारवाई करुन त्यांच्याविरोधात अतिजलद न्यायालयात खटला चालविण्यात यावा, अशी मागणी नंदुरबार येथील चर्मकार ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण गोविंद अहिरे, हेमंत अहिरे यांच्यासह आदींनी निवेदनातून केली आहे.
याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, नंदुरबार येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेणार्या तरुणीची व्हिडीओ क्लिप बनवुन आकाश रविंद्र पवार व मयुर योगेश अहिरे या दोघांनी तरुणीला ब्लॅकमेलिंग केली. तसेच सदर तरुणीला लाथाबुक्यांनी मारहाण करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या मारहाणीत सदर तरुणीला जखमी झाल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार घेतला.
या तरुणीवर अत्याचार व मारहाण केल्याप्रकरणी नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात आकाश रविंद्र पवार (रा.वाघोदा शिवार ता.नंदुरबार), मयुर योगेश अहिरे (रा.आदर्श नगर, शिंदखेडा) या दोघांविरुध्द भादंवि कलम 363, 366 ए, 376, 376 (2/एन), 325, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. म्हणुन महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार करुन मारहाण करणार्या दोषी असलेल्या आकाश रविंद्र पवार, मयुर योगेश अहिरे या दोघांवर कठोर कारवाई करुन अतिजलद गती न्यायालयात त्यांच्याविरोधात खटला चालविण्यात यावा.
तसेच त्यांचा जामीन देखील मंजूर करण्यात येवु नये. पिडीत तरुणीला शासकीय मदत मिळवुन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी चर्मकार ब्रिगेडचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष प्रविण गोविंद अहिरे, हेमंत अहिरे, प्रकाश अहिरे, अशोक अहिरे, जितेंद्र अहिरे, तुकाराम अहिरे, मनोज अहिरे, नंदाबाई अहिरे, लिलाबाई अहिरे, लक्ष्मण अहिरे, मोहिनी अहिरे आदींनी निवेदनातून केली आहे.








