अक्कलकुवा l प्रतिनिधी
अक्कलकुवा शहरात उपधान तप करून आलेल्या आराधकांच्या भव्य स्वागत करण्यात आले.

अक्कलकुवा शहरातील 5 जैन युवा बांधवानी नंदुरबार येथे प.पू.खरतरगच्छाधिपति आचार्य भगवंत श्री जिन मणिप्रभसूरीश्वरजी महाराजा यांचे शिष्य विपुल साहित्य सर्जक प.पू. मनितप्रभसागर म.सा आदि ठाणा यांच्या पावन निश्रेत प्रथम उपधान तपची आराधना पूर्ण करून मोक्षमाला धारण केल्याने अक्कलकुवा शहरात त्यांच्या भव्य स्वागत करण्यात आले.

यात शुभम गौतमचंद भंसाली, कुशल राजमल गुलेच्छा, ऋषभ संजयकुमार श्रीश्रीमाल, वंश अनिलकुमार श्रीश्रीमाल, आयुष अनिलकुमार श्रीश्रीमाल या पाच ही जनांनी प्रथम उपधानतप ची आराधना केली. अक्कलकुवा शहरातील तळोदा नाका येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. तळोदा नाका येथून वाजत-गाजत भव्य शोभायात्रा ची सुरुवात करण्यात आली शहरातील मुख्य बाजार चौक, झेंडा चौक, हनुमान गल्ली येथून श्री वासुपूज्य भगवान मंदिर येथे दर्शन वंदन करून जैन आराधना भवन येथे प.पू.साध्वी श्री प्रियस्नेहांजनाश्रीजी म.सा. आदि ठाणा यांना वंदन करून मांगलिक श्रवण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.








