नंदुरबार l प्रतिनिधी
खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केल्याचा निषेध करीत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे तीव्र निदर्शने करीत राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या नेतृत्वात प्रतिमेला जोडे मार आंदोलन करण्यात आले.
प्रसार माध्यमांसमोर बोलत असताना राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा तोल जाऊन त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केले आहे.या वक्तव्याचे प्रतिसाद नंदुरबार शहरात उमटत असून राष्ट्रवादी काँग्रेस चांगलेच आक्रमक झाले आहे.
नंदुरबार येथील गिरिविहार येथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अब्दुल सत्तार यांचा निषेध करीत अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मार आंदोलन केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे , शहर प्रमुख नितीन जगताप ,युवक अध्यक्ष सिताराम पावरा, लल्ला मराठे, बबलू कदमबांडे, सुनील राजपूत, रवींद्र जावरे, निलेश चौधरी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.