नंदूरबार | प्रतिनिधी
दक्षिणकाशी म्हणून संबोधल्या प्रकाशा येथील कार्तिक स्वामी मंदिराचे द्वार उद्या दि.७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.१५ वाजता उघडण्यात येणार असून दि.८ रोजी मध्यरात्री १२ वाजता बंद करण्यात येणार आहे.
प्रकाशा येथील कार्तिक स्वामींचे मंदिर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी वर्षातून एकदाच उघडण्यात येते. उद्या दि.७ रोजी कार्तिकी पौर्णिमा असल्याने हे मंदिर उघडण्यात येणार आहे. उद्या दि.७ रोजी कार्तिक पौर्णिमेच्या मुहूर्तावर संध्याकाळी ४.१५ वाजता भाविकांच्या दर्शनासाठी कार्तिक स्वामीच्या मंदिराचे द्वार उघडण्यात येणार आहेत.
दि.८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास हे दार बंद करण्यात येणार आहे. या दरम्यान भाविकांनी दर्शनाचा अधिक लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे कार्याध्यक्ष रमेश माळीच यांनी केले आहे.