नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा शहरातील वृंदावन नगरातून चोरट्याने दुचाकी चोरुन नेली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा शहरातील जुनी पोस्ट गल्ली येथील राजेश गुलाबचंद जैन यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ एल ९०५३) वृंदावन नगरातून चोरट्याने चोरुन नेली.
याबाबत राजेश जैन यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.किरण पावरा करीत आहेत.








