नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना महिलेच्या पर्समधून १ लाख ३२ हजाराचे सोन्याचे दागिने लंपास केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील ज्ञानदिप सोसायटीत येथील संगिता विजय बोरसे या नंदुरबार बस स्थानकात बसमध्ये चढत असतांना अज्ञाताने त्यांच्या पर्सची चैन उघडून त्यातील १ लाख ३२ हजार रुपये किंमतीचे ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व ४ ग्रॅम वजनाचे झुमके चोरुन नेले.
याबाबत संगिता बोरसे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक स्नेहदीप शिंदे करीत आहेत.








