Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धामध्ये नाशिक शहर पोलीस दलाने मारली बाजी, नंदूरबारचे भूषण चित्ते व निंबाबाई वाघमोडे ठरले सर्वात्कृष्ट खेळाडू

team by team
November 4, 2022
in Uncategorized
0
नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धामध्ये नाशिक शहर पोलीस दलाने मारली बाजी, नंदूरबारचे भूषण चित्ते व निंबाबाई वाघमोडे ठरले सर्वात्कृष्ट खेळाडू
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे झालेल्या नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धामध्ये नाशिक शहर पोलीस दलाच्या पुरुषांच्या संघाने वैयक्तिक व सांघिक खेळ या दोन्ही क्रीडा प्रकारात बाजी मारली तर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार भूषण चित्ते व निंबाबाई वाघमोडे यांनी सदर क्रीडा स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करत सर्वात्कृष्ट पुरुष व महिला ॲथलीटच्या पुरस्कारावर आपले नावे कोरली.
दि.31 ऑक्टोंबर पासून पोलीस मुख्यालय नंदुरबार येथील कवायत मैदानावर खेळल्या गेलेल्या 33 वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धाचे काल नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. श्री.बी.जी. शेखर पाटील, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे व नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा पोलीस दलाच्या कवायत मैदानावर समारोप समारंभ संपन्न झाला.
 पोलीस मुख्यालय नंदुरबार येथील कवायत मैदानावर खेळल्या गेलेल्या 33 वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धामध्ये नंदुरबार, धुळे, जळगांव, अहमदनगर, नाशिक ग्रामीण व नाशिक शहर असे 6 संघ हे सांधिक व वैयक्तिक खेळ यामध्ये स्विमींग, कुस्ती, ज्युडो, बॉक्सींग, वेटलिफ्टींग, 100, 200, 400, 800 मीटर धावणे, फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हॅण्डबॉल, खो-खो, कबड्डी, गोळाफेक, भालाफेक इत्यादी क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी झाले होते. सदर मध्ये एकुण 776 सांधिक व वैयक्तिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
येथील कवायत मैदानावर खेळल्या गेलेल्या 3.3 वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धामध्ये नाशिक शहर पोलीस दलाच्या पुरुषांच्या संघाने वैयक्तिक व सांघिक खेळ या दोन्ही क्रीडा प्रकारात सर्वोच्च 142 गुण मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले तर नाशिक ग्रामीण पोलीस दलाचा संघ 96 गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर, धुळे जिल्हा पोलीस दल 72 गुण घेवून तृतीय स्थानावर, जळगांव जिल्हा पोलीस दल 69 गुण घेवून चतुर्थ स्थानावर, अहमदनगर पोलीस दल-64 घेवून पाचव्या स्थानावर आणि नंदुरबार जिल्हा पोलीस दल 54 गुण घेवून सहाव्या स्थानावर राहिला.
तसेच नाशिक शहर पोलीस दलाच्या महिलांच्या संघाने वैयक्तिक व सांघिक खेळ या दोन्ही क्रोडा प्रकारात सर्वोच्च 120 गुण मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले तर अहमदनगर पोलीस दलाचा संघ 87 गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर, नंदुरबार जिल्हा पोलीस दल 45 गुण घेवून तृतीय स्थानावर, जळगांव जिल्हा पोलीस दल 44 गुण घेवून चतुर्थ स्थानावर, नाशिक ग्रामीण पोलीस दल- 32 गुण घेवून पाचव्या स्थानावर आणि धुळे जिल्हा पोलीस दल- 22 गुण घेवून सहाव्या स्थानावर राहिला. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार भूषण चित्ते व निंबाबाई वाघमोडे यांनी सदर क्रीडा स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करत सवोत्कृष्ट पुरुष व महिला ॲथलीटच्या पुरस्कारावर आपले नावे कोरली.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर पाटील यांनी सांगितले की, खेळ हे मानवी जीवनासाठी अत्यंत महत्वाचे आहे खेळामुळे वेळेचे बंधन, धैर्य, शिस्त, गटामध्ये काम करण्याची वृत्ती, आत्मविश्वास या गुणांची वृध्दी होते. पोलीस दलात काम करीत असतांना सततचे बंदोबस्त, कामाचा ताण यामुळे शारीरिक स्वास्थ्याकडे पोलीसांचे कायमच दुर्लक्ष होते. सततच्या या कामाच्या व्यापातून बाहेर पडून पोलीस दलात काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व अमलदार यांना आपल्या स्वास्थ्याकडे लक्ष दिले पाहिजे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी मैदानी खेळ हे एक महत्वाचे साधन आहे असे सांगून  क्रीडा प्रकारामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या पुरुष पोलीस अमलदार, महिला पोलीस अमलदार व सांघिक क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय, तृतीय आलेल्या संघांचे अभिनंदन करुन कौतूक केले. तसेच पुढील काळात होणाऱ्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत नाशिक शहर व नाशिक परिक्षेत्र हे उत्तम कामगिरी करतील असा मनोदय व्यक्त करुन 34 वी परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा जळगांव येथे आयोजित करण्यात येणार असून ध्वज जळगांव जिल्ह्याकडे दिला.
तसेच पोलीस मुख्यालय नंदुरबार येथील राखीव पोलीस निरीक्षक शदेवनाथसिंग राजपूत यांनी सदर स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंची राहाण्याची उत्तम व्यवस्था, सर्व मैदाने याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करुन 33 वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा यांच्या यशस्वी आयोजनात मोलाची भूमीका बजावली. नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी  सचिन हिरे यांनी आभार प्रदर्शन केले.:
सदर समारोप प्रसंगाच्यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  पी. आर. पाटील, धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, मालेगांव ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, चाळीसगांवचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, धुळ्याचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव तसेच पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय)  विश्वास वळवी, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उप अधीक्षक आत्माराम प्रधान, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस खेळाडू उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील ३४० प्राथमिक शिक्षकांना एक स्तर वेतनश्रेणी लागू करण्याचे आदेश

Next Post

पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीस मुदतवाढ

Next Post
आता होणार वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी

पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीस मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add