नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहर शिंपी समाज व श्री.संत शिरोमणी नामदेव महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे आज संत शिरोमणी नामदेव महाराज यांची जयंती उत्सव जेष्ठ नागरीक सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
नामदेव महाराज यांच्या जयंती सोहळ्या निमित्त जेष्ठ साहित्यीक व प्रसिद्ध व्याख्याते डॉ.श्री.विश्वासराव पाटील यांचे सागराएवढे संत नामदेव हे व्याख्यान ठेवण्यात आले.यावेळी त्यांनी संत नामदेव महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाशझोत टाकत प्रत्येक समाजासाठी नामदेव महाराजानी केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मध्यवर्ती संस्थेचे उपाध्यक्ष सुभाषशेठ सावळे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यीक डॉ.पीतांबर सरोदे, ऍड.गोविंदपाटील , श्री.गंगरानी ,जिल्हाध्यक्ष सोमनाथ शिंपी,जिल्हा संघटक विजय सावळे ,महिला जिल्हाध्यक्षा सरिता भामरे,शहराध्यक्षा रंजना शिंपी,तालुकाध्यक्ष मुरलीधर शिंपी उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करुन दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बळवंत निकुंभ यांनी केले.
तर प्रमुख वक्त्यांचा परिचय विजय देवरे यांनी तरसूत्र संचालन प्रदीप शिंपी यांनी केले .आभार प्रदर्शन योगेश शिंपी यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीसाठी दत्तात्रय शिंपी,लोटन बाविस्कर ,राजेंद्र जगताप,योगेश खैरनार,मोहन भामरे,दिनेश पवार अनिल शिंपी,प्रसन्न शिंपी,रवी जगताप आदींनी परिश्रम घेतले. यावेळी समाजातील बंधू भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.








