नंदुरबार : नवापूर शहरातील रंगावली कॉलनी येथे पाटबंधारे कार्यालयाच्या बंद कर्मचारी वसाहतीचे उघडा दरवाज्याच्या रुममधून चोरट्याने पाणी अडविण्यासाठी वापरल्या जाराऱ्या ३२ हजार रुपये किंतीच्या १६ लोखंडी पट्ट्या चोरुन नेल्या.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर शहरातील रंगावली कॉलनीत पाटबंधारे कार्यालयाचे असलेल्या कर्मचारी वसाहतीत रुम आहे. सदर रुमच्या उघडा असलेल्या दरवाजातून चोरट्याने आत प्रवेश करुन रुममधून कोल्हापुरी सिमेंटच्या बंधाऱ्यामधील पाणी अडविण्यासाठी असलेल्या ३२ हजार रुपये किंमतीच्या १६ लोखंडी पट्ट्या चोरुन नेल्या. याबाबत जितेश सखाराम गावित यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोहेकॉ.दादाभाई वाघ करीत आहेत.








