नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हा परिषदेच्या बांधकाम समिती व आरोग्य समिती सभापतीपद जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक यांची निवड करण्यात आली.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांवर सभापतीपदासाठी निवड करण्यासाठी आज जिल्हा परिषदेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र यावेळी बांधकाम सभापतीपद कोणालाच देण्यात आले नाही.
मात्र सायंकाळी जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागातर्फे उपमुख्यकार्यकारी अधिकारी आर.पी.पाटील यांनी याबाबत पत्रक प्रसिध्द केले. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या विषय सभापतीपदासाठी जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत यांनी बैठकीत झालेल्या खाते वाटपानंतर सायंकाळी त्यात बदल करत बांधकाम समिती व आरोग्य समिती सभापतीपद जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक यांची तर शिक्षण व वित्त समिती सभापतीपदी गणेश रूपसिंग पराडके, कृषी समिती व पशुसंवर्धन समिती सभापतीपदी हेमलता अरूण शितोळे यांची निवड करण्यात आली.