नंदूरबार l प्रतिनिधी
धुळे ते शिरपूर मुंबई आग्रा महामार्गावरील सावळदे गावाजवळ भीषण अपघात घडला असून गावा नजीक असल्या तापी नदीवरील पुलावरून मालवाहू आयशर ट्रक नदीपात्रात कोसळला आहे.
हा ट्रक मालेगांव येथून मध्यप्रदेशातील इंदोर कडे जात असताना 3 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. हा चौपदरी महामार्ग आहे. मात्र चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने ही घटना घडली.
ट्रकचा सहचालक सुदैवाने बचावला त्याला नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले आहे.मात्र चालक ट्रक चालक पाण्यात बुडाला असून त्याचा तपास सुरू असून पोलीस व प्रशासनातर्फे जोरात मदत कार्य सुरू आहे.