नंदूरबार l प्रतिनिधी
एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,तळोदा येथील कार्यालयीन अधीक्षक यांनी तक्रारदाराकडून 5 हजार रुपये लाचेची मागणी केली,लाच स्विकारल्याने लाचुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने न्यायालयाने एक वर्ष कैदेची व 5 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी लोकसेवक रमेश रेशमा पाडवी, कार्यालय अधीक्षक (वर्ग-3),एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प,तळोदा ता. तळोदा यास लाच प्रकरणी कारावास व दंडाची शिक्षा यातील तक्रारदार यांना कार्यमुक्त झाल्याच्या आदेशाची प्रत देण्याकरीता आरोपी लोकसेवक रमेश रेशमा पाडवी, कार्यालय अधीक्षक (वर्ग-3), एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, तळोदा ता. तळोदा यांनी तक्रारदार यांच्याकडून 5000 रुपये लाचेची मागणी केलेली लाच पंच साक्षीदारांसमक्ष स्विकारल्याने
रंगेहाथ पकडून तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर खटल्याचे सुनावणीमध्ये सी.एस. दातीर जिल्हा व अति सत्र न्यायाधीश,शहादा न्यायालय यांनी आरोपीस साक्षी व पुराव्यांचे आधारे दोषी ठरवून लाचलुचपत प्रतिबंध कायदा, 1988 कलम 7 व 13 (2) प्रमाणे प्रत्येकी एक वर्ष कैदेची शिक्षा व 5 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. नमुद खटल्यात सहायक सरकारी अभियोक्ता स्वर्णसिंग गिरासे यांनी सरकारतर्फे कामकाज चालविले.
सदर गुन्हयाचा तपास किरणकुमार बी. खेडकर, तत्कालीन पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नंदुरबार यांनी केलेला आहे. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोना /436 अमोल मराठे नेम, अँटी करप्शन ब्युरो, नंदुरबार यांनी कामकाज पाहिले.
लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अँटी करप्शन ब्युरो, नंदुरबार कार्यालयास खालील नमुद क्रमांकावर संपर्क साधण्याबाबत आवाहन पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नंदुरबार राकेश आनंदराव चौधरी केले आहे.