नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील वावद येथे शेतकरी उत्पादक कंपनीस स्मार्ट विभागीय नोडल अधिकाऱ्यांची भेट देत पाहणी केली.
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट योजनेच्या अंतर्गत सरलकृष्ण शेतकरी उत्पादक कंपनी वावद ता. जि. नंदुरबार येथे नाशिक विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली व स्मार्टचे विभागीय नोडल अधिकारी सुनील वानखेडे, राज्यस्तरीय अंमलबजावणी कक्ष स्मार्ट प्रकल्प ,पुणे येथील मूल्य साखळी व्यवस्थापक श्रीमती धम्मशिला भडीकर, विभागीय अंमलबजावणी कक्ष नाशिक येथील कृषी व्यवसायतज्ञ जितेंद्र शहा, प्रकल्प संचालक , जिल्हा कृषी अधिकार निलेश भागेश्वर, कृषी विज्ञान केंद्र कोळदा येथील किड व रोग शास्त्रज्ञ पद्माकर कुंदे, मूल्य साखळी तज्ञ प्रदीप लाटे , उमाकांत पाटील , चंद्रकांत बागुल, आत्मा विभाग व तालुका कृषी अधिकारी स्वप्निल शेळके यांच्या उपस्थितीत कंपनी भेट आयोजन करण्यात आली होते.
नंदुरबार तालुक्यातील वावद गावातील सरलकृष्ण शेतकरी उत्पादक कंपनी स्मार्ट योजनेअंतर्गत मिरची प्रक्रिया उद्योगात सहभागी होणार आहे त्याबाबत कंपनीने आर्थिक व तांत्रिक नियोजन केले आहे .सद्यस्थितीत कंपनी मार्फत सभासद व परिसरातील शेतकरींना CSC सेंटर मार्फत गावकरींना आयुष्मान भारत , ई श्रमकार्ड , इ केवायसी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम व कृषी निविष्ठा केंद्र मार्फत सुविधा देण्याचे कार्य सुरु असल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी दिली.
विभागीय नोडल अधिकारी सुनील वानखेडे यांनी सरलकृष्ण शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळ व सभासद शेतकऱ्यांशी कंपनीच्या प्रकल्पाविषयी चर्चा करून कंपनीच्या प्रकल्पाची स्थळ पाहणी व मार्गदर्शन केले. देत असलेले सेवा बाबत श्री सुनील वानखेडे नोडल अधिकारी नाशिक विभाग यांनी प्रशंसा केली व कृषी विभाग पूर्णतः आपले सोबत असेल असे आश्वासन दिले
तसेच स्मार्ट प्रकल्पांतर्गत कंपनीने मिरची पिकाची मुल्य साखळी विकसित करून मिरची हळद ,मसाले यांचा गुणवत्तापूर्ण मालाची निर्मिती करून ब्रांड विकसित करावा असे स्मार्ट प्रकल्प राज्यस्तरीय कक्षाच्या मुल्यसाखळी तज्ञ श्रीमती धम्मशीला भडीकर यांनी सांगितले .
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक चंद्रकांत बागुल यांनी तर आभार कृषी पर्यवेक्षक संदीप पाटोळे यांनी केले तर कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन मंडळ कृषी अधिकारी सुनील गांगर्डे, सरलकृष्ण शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष मनोज पाटील,संचालक श्रीमती मिनाबाई पाटील , संतोष पाटील , शामराव पाटील , श्रीमती राजेश्री देवरे , प्रकाश पाटील यांनी केले.