बोरद l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील करडे ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी आ.राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
१७ ऑक्टोबर २०२२ रोजी लागलेल्या तळोदा तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतीचा निकाल लागला यामध्ये ११ ग्रामपंचायतीत कॉग्रेस पक्षाने वर्चस्व राखलं तर ४० ग्रामपंचायतीवर भाजपने बाजी मारली.३ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी पक्ष्याने मुसंडी मारली.वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याने फक्त ६ ठिकाणी आपले उमेदवार दिले होते.तुलनेत त्यांनी ३ ठिकाणी आपले वर्चस्व सिद्ध केले.
असे असले तरी बोरद परिसरात काँग्रेस पक्ष्याने २ ग्रामपंचायतीत आपले सरपंच व सदस्य निवडून आणले. तुळाजा येथे भाजपा चे पॅनल लढले मात्र एक सदस्य वगळता त्यांच्या हाती काहीच लागले नाही.याउलट काँग्रेस पक्ष्याचे माजी पंचायत समिती सदस्य सिताराम राहसे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा मुलगा सचिन राहसे यांनी याठिकाणी मोठे यश प्राप्त केले.
त्याचबरोबर करडे ग्रामपंचायतीवर देखील काँग्रेस पक्षाने बाजी मारत सरपंचासह सदस्य निवडून आणले.मात्र निवडून आल्यानंतर सरपंचासह सदस्यांनी आमदार राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.त्याचप्रमाणे दसवड येथे ही सदस्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.