नंदूरबार l प्रतिनिधी
पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथील मैदानावर 33 वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली असून खेळल्या गेलेल्या स्पर्धे दरम्यान परिक्षेत्रातील सर्व संघांमध्ये सर्वसाधारण विजेते पदासाठी जोरदार संघर्ष पाहावयास मिळाला.
पोलीस मुख्यालय नंदुरबार येथील कवायत मैदानावर खेळल्या गेलेल्या फुटबॉलच्या सामन्यांमध्ये नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या संघाने नाशिक ग्रामीण संघाचा 2-1, अहमदनगरच्या संघाने नाशिक शहराचा, जळगावच्या संघाने धुळे संघाचा 5-0 ने एकतर्फी पराभव केला.
हॅण्डबॉलच्या सामन्यांमध्ये नंदुरबारच्या पुरुष संघाने नाशिक ग्रामीणचा 12-3 व जळगांवचा, अहमदनगरच्या संघाने नाशिक ग्रामीणचा, नाशिक शहरच्या संघाने धुळे संघाचा पराभव केला.
हॉकीच्या सामन्यांमध्ये नाशिक शहर संघाने नाशिक ग्रामीण संघाचा 4-0 व अहमदनगरचा संघाचा, तर अहमदनगर संघाने जळगांच्या संघाचा 2-0, नाशिक ग्रामीण संघाने नंदुरबारचा 2-0, जळगांवच्या संघाने धुळे संघाचा 3-2 असा पराभव केला.
व्हॉलीबॉलच्या सामन्यांमध्ये जळगांवच्या पुरुष संघाने अहमदनगरचा संघाचा तर अहमदनगरच्या संघाने नाशिक ग्रामीण संघाचा, धुळेचा संघाने नाशिक शहर संघाचा, जळगांवच्या संघाने नंदुरबारच्या संघाचा पराभव केला.
बास्केट बॉलच्या सामन्यांमध्ये नाशिक ग्रामीणच्या पुरुषांच्या संघाने जळगांव पोलीस दलाचा 32-04 असा एकतर्फी पराभव केला. तर नाशिक ग्रामीणच्या महिलांच्या संघाने देखील जळगांव संघाचा 12-09, नाशिक शहर महिलांच्या संघाने नंदुरबारच्या संघाचा 28-05 असा धुव्वा उडविला. अहमदनगरच्या महिला संघाने धुळे संघाचा, तर धुळ्याच्या पुरुषांच्या संघाने अहमदनगरचा पराभव केला.
खो-खोच्या सामन्यांमध्ये अहमदनगरच्या पुरुषांच्या संघाने धुळे संघाचा, तर धुळ्याच्या महिला संघाने अहमदनगरचा, नाशिक ग्रामीणच्या पुरुष व महिला संघाने जळगांच्या पुरुष व महिला संघाचा, नाशिक शहराच्या पुरुष संघाने नंदुरबारच्या संघाचा पराभव केला.
कबड्डीच्या सामन्यांमध्ये नाशिक ग्रामीणच्या पुरुष संघाने नाशिक शहरावर 5 गुणांनी व नंदुरबारच्या संघावर विजय मिळविला तर धुळेच्या पुरुष संघाने जळगांवच्या संघावर सहज विजय मिळविला. तसेच पुरुषांच्या लांब उडी या क्रीडा प्रकारात नाशिक शहरचे प्रशांत लोंढे यांनी 5.29 मी. लांब उडी मारुन प्रथम क्रमांक पटविला तर धुळ्याचे भगवान ढाकणे यांनी 5.12 मी. लांब उडी मारुन द्वितीय क्रमांक. त्याचप्रमाणे महिलांच्या लांब उडी या क्रीडा प्रकारात नंदुरबारचे दिव्या वाघमारे यांनी 4.20 मी. लांब उडी मारुन प्रथम क्रमांक पटविला तर जळगांवचे वैशाली सादरे यांनी 3.83 मी. लांब उडी मारुन द्वितीय क्रमांक पटकविला.
तसेच क्रॉस कंट्री या क्रीडा प्रकारात नाशिक शहर पोलीसांचा दबदबा पाहावयास मिळविला. 5000 मीटर पुरुषांच्या क्रॉस कंट्रीमध्ये नाशिक ग्रामीणचे सावळीराम शिंदे व मारुती माळी अनुक्रमे प्रथम व द्वितीय होते. तसेच महिलांच्या 5000 मीटर क्रॉस कंट्रीमध्ये नाशिक शहराची अश्विनी देवरे व नाशिक ग्रामीणची पल्लवी कुंवर यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविला.
पुरुषांच्या 3000 ट्रीपल चेस धावण्याच्या शर्यतीत अहमदनगरचे मारुती माळी व नाशिक शहराचे गोरख जाधव प्रथम व द्वितीय क्रमांकावर राहिले. पुरुषांच्या 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत नाशिक शहराचा अंकुश पावरा प्रथम व अहमदनगरचा रामहरी तिडके द्वितीय क्रमांकावर राहिला. महिलांच्या 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत अहमदनगरची मिरा हांडे व धुळ्याची सपना पवार अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकावर राहिले.
4 X 100 मीटर रिले पुरुषांच्या धावण्याच्या शर्यतीत नाशिक शहर प्रथम व धुळे संघ द्वितीय क्रमांकावर तर 4 X 400 मीटर रिले महिलांच्या धावण्याच्या शर्यतीत अहमदनगरने प्रथम व जळगांवने द्वितीय क्रमांक पटकाविला.
पुरुषांच्या 200 मीटर धावण्याच्या अंतीम सामन्यामध्ये नंदुरबारच्या नाना पाडवीने प्रथम तर शि शहराचे दिनेश माळी यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या अंतीम सामन्यामध्ये जळगांवच्या काजल सोनवणे हिने प्रथम तर धुळ्याची रजनी पाटील हिने द्वितीय क्रमांक पटकाविला.
आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांमधील पात्र असलेले संघ 3 नोव्हेंबर रोजी उपांत्य फेरीत खेळणार असून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. श्री.बी.जी.शेखर पाटील यांच्या उपस्थितीत 4 नोव्हेंबर रोजी अंतिम सामने खेळले जाणार आहेत.अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी दिली.