नंदुरबार l
शहादा तालुक्यातील नागझिरी येथे दुचाकीवर बसू न दिल्याच्या रागातून ब्लेडने वार करुन गंभीर दुखापत केल्याप्रकरणी एकाविरोदात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील राणीपूर येथील विकेश सेंगा पावरा यांनी संतोष भोग्या भोसले यांना दुचाकीवर बसू दिले नाही. याचा राग आल्याने संतोष भोसले याने शिवीगाळ करीत विकेश पावरा यांच्या गळ्यावर ब्लेडने वार करुन गंभीर दुखापत केली.
याबाबत विकेश पावरा यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात संतोष भोसले याच्याविरोधात भादंवि कलम ३२६, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण करीत आहेत.