शहादा l प्रतिनिधी
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांचे वतीने ‘नो प्लास्टिक इज फँटास्टिक’ विषयावर पथनाट्य व प्लास्टिक कचरा संकलन उपक्रम राबविण्यात आला आहे.
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा येथील राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे दि.30 ऑक्टोबर रोजी स्वयंसेवकांनी शहादा बसस्थानक परिसरात ‘नो प्लास्टिक इज फँटास्टिक’ या विषयावर जनजागृतीवर आधारित पथनाट्य सादर करून प्लास्टीक कचरा गोळा केला. भारत सरकारच्या युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या परिपत्रकनुसार आझादी का अमृतमहोत्सव वर्ष अंतर्गत प्लास्टिक निर्मूलन उपक्रमाचे आयोजन देशभर राबविले जात आहेत. यावेळी शहादा बस स्थानक आगारचे एस.डी.कुलकर्णी, आगार प्रमुख योगेश लिंगायत यांच्या सह कर्मचाऱ्यांनी सहकार्य करून स्वयंसेवकांचे कौतुक केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.आर.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नो प्लास्टिक इज फँटास्टिक’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, प्राचार्य डॉ. आर.एस.पाटील, उपप्राचार्य डॉ. एम.के.पटेल, डॉ. एस.डी. सिंदखेडकर यांनी उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.राजेंद्र पाटील, डॉ. वजीह अशहर, डॉ. वर्षा चौधरी आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.