नंदूरबार l प्रतिनिधी
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या आदेशानुसार भारत जोडो यात्रेत नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सामील होण्याच्या संदर्भामध्ये चर्चा करून निर्णय घेण्यासाठी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ॲड. के. सी. पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार येथील त्यांच्या निवासस्थानी दि. 2 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर बैठकीस नंदुरबार जिल्ह्याचे भारत जोडो यात्रेचे समन्वयक आमदार शिरीष चौधरी जळगाव हे देखील उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत त्यासाठी दि. 2 नोव्हेंबर 2022 रोजी होणाऱ्या बैठकीस तालुक्यातील सर्व सेलचे अध्यक्ष,पदाधिकारी,जिल्हा परिषद सदस्य,सभापती, पंचायत समिती सदस्य, सरपंच, सदस्य व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारत जोडो यात्रेचे समन्वयक दिलीप नाईक यांनी केले आहे.