नंदुरबार l
जिल्ह्यात शुद्ध पाण्याच्या नावाखाली बेकायशेदीरपणे पाण्याची विक्री होत पाण्याचे जार विक्रेत्यांची नियमित तपासणी करुन बेकायदेशीर तसेच अशुद्ध पाणी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य महेंद्र चौधरी यांनी केली आहे. तसे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यात शुद्ध पाण्याच्या थंड पाणी देवून नागरीकांच्या आरोग्याशी जीवेघेणा खेळ सुरु आहे. जिल्ह्यात आरओ वॉटर सप्लायर्सच्या नावाखाली अनेक ठिकाणी थंड केलेले क्षारयुक्त अशुद्ध पाणी प्लास्टीकचे ड्रममध्ये जार भरुन शहरवासियांना तसेच व्यापारी बांधव, जिल्ह्यातील शासकीय कार्यालय आदी ठिकाणी विक्री होत आहे. पाण्याची शुद्धता व पात्रता याची नियमित तपासणी होवून पाण्याचा नमुना घेवून योग्य अधिकार्यांमार्फत एनओसी घेणे क्रमप्राप्त असताना थंड पाण्याची कुठलीही तपासणी होताना दिसत नाही.
अन्नभेसळ तपासणी कार्यालयातील अधिकार्यांनी आतापर्यंत किती आरओ प्लांटचा नावाखाली सुरु असलेल्या जीवघेणा प्रकाराची किती तपासणी केली? नंदुरबार जिल्ह्यात असे किती प्लांट कार्यारत आहेत? याची संपूर्ण माहिती अधिकार्यांना आहे का? किती प्लांटधारकांना दंडात्मक कारवाई झाली आहे? अशा नोंदणीकृत प्लांटची पाण्याची तपासणी करण्यात यावी. तसेच अयोग्य पाणी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि जनसामान्यांचे आरोग्याचा प्रश्न मार्गी लावावा.
अन्नभेसळ तपासणी अधिकारी जर आपल्या कर्तव्यात कसूर करीत असतील तर अशा अकर्तव्यदक्ष अधिकार्यांना जाब विचारण्यात यावा. तरी महोदयांना विनती की, नंदुरबार जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे जार विक्रेत्यांची नियमित तपासणी करुन बेकायदेशीर तसेच अशुद्ध पाणी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महेंद्रभाई मंगा चौधरी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.








