शहादा l प्रतिनिधी
लोहपुरुष माजी केंद्रीय गृहमंत्री भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता रॅलीसह शहरातील विविध भागातील महापुरुषांच्या पुतळ्यांना आ.राजेश पाडवी व भाजपा प्रदेश सदस्य दीपक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.

शहरातील गुजर गल्लीतील गांधी चौकात उभारण्यात आलेल्या शामियान्यात सरदार वल्लभभाई पटेल,सहकार महर्षी अण्णासाहेब पी.के पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आ.राजेश पाडवी, सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील, माजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, तहसीलदार डॉ.मिलींद कुलकर्णी, पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत, समाजाचे ज्येष्ठ सुभाष शंकर पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजित पाटील, माजी उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष दीपक पटेल, अरविंद कुवर, माजी नगरसेवक के.डी.पाटील, डॉ.योगेश चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, भाजपाचे आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मिकांत वसावे, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष रमाशंकर माळी,सकल मराठा समाज समन्वयक अनिल भामरे यांच्या सह विविध पक्ष, संस्था, संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकता रॅलीत विविध देखावे सादर करण्यात आले.सरदार पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आकर्षण होते.महिलांनी सूमारे शंभर मीटर लांब तिरंगा ध्वज घेऊन सहभाग घेतला.जगमा इंटर नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वज हाती घेऊन रॅलीत सहभाग घेतला होता.शालेय विद्यार्थीनींनी लेझीम पथक लक्षवेधी ठरले.यावेळी शहरातील विविध भागातील महापुरुषांच्या पुतळ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.विविध सामाजिक संघटनांनी जागोजागी थंड पाणी, थंड पेय, नाश्ता आदि व्यवस्था केली होती.रॅली यशस्वीतेसाठी जय सरदार वल्लभभाई पटेल उत्सव समिती शहादाच्या कार्यकर्ते व पदाधिकारींनी सहकार्य केले.








