नंदुरबार l प्रतिनिधी
पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने याबाबत विचारपूस करण्यासाठी गेलेल्या महिलेस जिवेठार मारण्याची धमकी देत धक्का देवून जमिनीवर पाडल्याने दुखापत झाल्याने तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील चौधरी गल्लीतील रहिवासी संदिप चौधरी याने मंगलाबाई गणपत चौधरी व त्यांच्या मुलांविरोधात शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी विचारपूस करण्यासाठी मंगलाबाई चौधरी व दिराणी मनिषा चौधरी असे दोघेजण संदिप चौधरीकडे विचारपूस करण्यासाठी गेले असता अंगणात उभे असतांना विनोद शंकर चौधरी व अमृत शंकर चौधरी या दोघांनी मंगलाबाई चौधरी यांना शिवीगाळ केली.
तसेच घरी आल्यास जिवेठार मारण्याची धमकी दिली. शांताबाई चौधरी यांनी मंगलाबाई चौधरी यांना धक्का दिल्याने त्या जमिनीवर पडल्याने त्यांच्या खांद्याला मुक्कामार लागला. याप्रकरणी मंगलाबाई चौधरी यांच्या फिर्यादीवरुन तिघांविरोधात नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.श्री.पावरा करत आहेत.








