नंदुरबार l
शहरातील सी.बी.पेट्रोल पंपाजवळ शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन एकास दगडाने मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील अक्षय राजू चोंडे यांनी शिवीगाळ का केली. या कारणावरुन कुणाल गजानन पाटील, आकाश गजानन पाटील, संजय गजानन पाटील व कल्पेश मोरे यांनी अक्षय चोंडे यांना सी.बी.पेट्रोल पंपाजवळ दगडशने व काठीने मारहाण करुन दुखापत केलाी.
तसेच शिवीगाळ करीत दमबाजी केली. याबाबत अक्षय चोंडे यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.सचिन पिंपरे करीत आहेत.








