नंदुरबार l
तळोदा तालुक्यातील राजविहिर गावातील डेगाटी रस्त्यावर भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एकास डोक्यावर काठीने मारुन दुखापत केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा तालुक्यातील राजविहिर येथील प्रकाश प्रतपासिंग पाडवी यांचा मुलगा पल्लव यांच्याशी भांडणाची कुरापत काढून भांडण करीत असतांना प्रकाश पाडवी हे सोडविण्यासाठी गेले.
याचा राग आल्याने उत्तम शेका पाडवी यांनी प्रकाश पाडवी यांना काठीने डोक्यावर मारहाण करुन दुखापत केली. तसेच अजय भरत मेटकर, तेजस उत्तम पाडवी व सगुबाई उत्तम पाडवी यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. याबाबत प्रकाश पाडवी यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.पौलाद भील करीत आहेत.








