नंदुरबार l
तालुक्यातील खापरखेडा येथे बॅनर फाडल्याच्या कारणावरुन चौघांना मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील खापरखेडा गावाच्या बाहेर पावसा ऋषींच्या यात्रेत स्वागताचे बॅनर लावले होते. सदर बॅनर आकाश प्रकाश भील यांनी फाडल्याच्या गैरसमजूतीतून हिंमत खंडू भील, मुकेश हिंमत भील, दिलीप भिका भील, कांतीलाल देविदास भील, सतू दशरथ भील, भटू सतु भील,
अजय केशव भील व भरत एकनाथ भील यांनी आकाश प्रकाश भील, प्रतिभा भरत भील, कलाबाई कायसिंग भील व संगिताबाई प्रकाश भील यांना हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत आकाश भील यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.अनिल सोनवणे करीत आहेत.








