नंदुरबार
दादासाहेब गायकवाड भूमिहीन शेतमजूर सबलीकरण योजनेतील जाचक अटी अटि रद्द करून भाव वाढविण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षातर्फे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या कडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे नंदुरबार जिल्हा दौर्यावर आले असता आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित व खा.डॉ. हिना गावित यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे नंदुरबार युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील व नंदुरबार युवक शहराध्यक्ष सचिन पिंपळे यांनी सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला. यादरम्यान निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे कि, दादासाहेब गायकवाड भूमिहीन शेतमजूर सबलीकरण योजनेचा लाभ घेण्यास पात्र होण्यासाठी अनेक जाचक अटींचा समावेश करण्यात आला आहे. यात अनेक लाभार्थी हे दादासाहेब गायकवाड भूमी शेतमजूर सबलीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असून देखील सदर योजनेतील जाचक अटींमुळे योजनेच्या लाभापासून लाभार्थी वंचित राहत आहेत. सन २००९ पासून ते आजतागायत योजनेचा लाभ नंदुरबार जिल्ह्यातील वंचित मागासवर्गीय समाजातील गरजू लोकांना घेता आलेला नाही.
तसेच सद्यस्थितीत शेतजमिनीचे भाव वाढले असल्यामुळे योजनेत शेत जमिनीसाठी असणारी एकरी रक्कम ही अतिशय तुटपुंज्या स्वरूपाची असून या योजनेच्या लाभार्थ्यांना शेती विक्री करणारे शेतकरी लाभत नाहीत.तरी लाभार्थी कोणत्याही तालुक्यातील असला तरी त्याला जिल्ह्यात कुठेही शेत जमिनीचा लाभ घेता यावा अशी अट टाकण्यात यावी .अन्यथा जाचक अटींमुळे लाभार्थी अपात्र झाल्यामुळे भविष्यात सदर योजना ही लाभार्थी प्राप्त न झाल्याचे शासनाच्या निदर्शनास जर आले तर योजना बंद होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तरी सदर योजनेचे स्वरूप व बाजार भाव पाहता एकरी बागायत शेतजमीन १५ लाख रुपये कोरडवाहू शेतजमीन ८ लाख रुपये किमान आधारभूत दर निश्चित करण्यात यावी अशी मागणी नंदुरबार जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले युवक आघाडीतर्फे करण्यात आली.








