नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार पालिकेच्या नुतन इमारतीचे राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या दौऱ्यादरम्यान पालिकेच्या कर्मचार्यांना चार हजाराचा फटका बसल्याने त्यांनी दबक्या आवाजात नाराजी व्यक्त केली.
नंदुरबार पालिकेच्या नुतन इमारतीचे राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज नाटयमंदिरात झालेल्या कार्यक्रमात नंदुरबार पालिकेचे सर्व कर्मचारी कोट घालून उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर एका कर्मचार्याने सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या दौर्यामुळे अनेक अधिकारी व कर्मचार्यांना आर्थिक फटका बसला असून पालिकेने कर्मचार्यांच्या पगारातून चार हजार रूपये कपात करून त्यांना कार्यक्रमात कोट घालणे बंधनकारक करण्यात आले. त्यामुळे भव्य वास्तुचे लोकार्पण झाले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दौर्यामुळे दिवाळीनंतर कर्मचार्यांना चार हजाराचा भुर्दंड सहन करावा लागला आहे.








