Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खान्देशना लोके मुठभर लेतस तगारीभर देतस : मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे

team by team
October 30, 2022
in राजकीय
0
खान्देशना लोके मुठभर लेतस तगारीभर देतस :  मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी अहिराणी भाषेत सुरूवात करत राम राम कशे बठ्ठा, दिवायी कशी गई जोरमाना असे सांगत खान्देशना लोके पक्का दिलदार शेतस मुठभर लेतस तगारीभर देतस  काळजी करू नका, तुम्हना भाऊ एकनाथ शिंदे तुम्हना करता जे जे शक्य ते ते करी असे सांगत उपस्थितांचे मने जिंकली.
अहिराणी भाषेत भाषणाला सुरुवात करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांची मने जिंकली. नंदुरबार येथील जीटीपी महाविद्यालयाच्या प्रांगणावर आयोजित शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाच्या सभेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर मंत्री गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, अब्दुल सत्तार, आ.मंजुळा गावित, आ.चिमणराव पाटील, आ.किशोर पाटील, किरसिंग वसावे, विजयसिंग पराडके आदी उपस्थित होते. यापुढे बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,  गेल्या अडीच ते तीन महिन्यात गेल्या अडीच वर्षात थांबलेल्या विकासाला, रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याचे काम केले आहे. तीन महिन्यात ७२ मोठे निर्णय घेतले आहेत. जल सिंचनाच्या प्रकल्पांना गती देण्याचे काम करत आहोत. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम सुरु आहे.
लोकांच्या मनातले सरकार स्थापन झाले असून सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे सरकार आहे.शेतकऱ्यांना सुखाचे दिवस यावेत यासाठी जल सिंचन प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. आगामी काळात सेंद्रीय शेतीला देखील प्राधान्य दिले जाणार आहे. पोलिसांसाठी ५० लाखांचे घर अवघ्या १५ लाखात देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारचेही काम करण्यासाठी पाठबळ असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नंदुरबार जिल्ह्यासह राज्यातील कुपोषण निर्मूलनासाठी सरकार काम करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच तोरणमाळ पर्यटन विकास, नर्मदा-तापी प्रकल्प, एमआयडीसी आदी प्रकल्पांना गती देवून जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
बातमी शेअर करा
Previous Post

छोटे पप्पू व मी राजीनामा देतो, मग दूध का दूध होईल : ना.अब्दुल सत्तारांचा आ.आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात पालिकेच्या कर्मचार्‍यांना चार हजाराचा फटका

Next Post
मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात पालिकेच्या कर्मचार्‍यांना चार हजाराचा फटका

मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात पालिकेच्या कर्मचार्‍यांना चार हजाराचा फटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add