नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेचा मेळावा उत्साहात पार पडला यावेळी कृषीमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी आ.आदित्य ठाकरे यांच्यावर जहरी टीका करीत राज्यातील छोटे पप्पू हे एका बापाची औलाद असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. तुम्ही वरळीतून लढा मी शिल्लोडमधून लढतो मग होवून जावू द्या, दूध का दूध पानी का पानी असे आव्हान दिले.
यावेळी कृषीमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, राज्य शासनाने सुमारे ७ लाख शेतकर्यांच्या खात्यात एकाचवेळी २ हजार ५०० कोटी रूपये जमा केले. शेतकर्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरपाई मिळत आहे. हे सरकार शेतकर्याचे सरकार आहे.
सामान्य जनता व शेतकर्यांचे मदतीची भुमिका राज्य शासनाची मात्र राज्यातील काही जणांना याबाबत पोटशुळ उठत आहे. असे सांगत मंत्री अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली. ते म्हणाले की, राज्यातील छोटे पप्पू हे एका बापाची औलाद असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. तुम्ही वरळीतून लढा मी शिल्लोडमधून लढतो मग होवून जावू द्या, दूध का दूध पानी का पानी, असे आव्हान त्यांनी दिले.








