नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या मेळाव्या नंतर मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावीत यांच्या घरी सदिच्छा भेट दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे नंदुरबार दौर्यावर आले होते. यावेळी विशेषबाब म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेचा मेळावा आटोपल्यानंतर पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावीत यांच्या घरी त्यांनी सदिच्छा भेट दिली.

पालिकेच्या नुतन इमारतीच्या उद्घाटना आदी ते पालकमंत्र्यांच्या घरी जाणार होते. मात्र येण्यास उशिर झाल्याने मेळाव्यानंतर त्यांनी पालकमंत्र्यांच्या घरी भेट दिली. यावेळी कृषीमंत्री ना.अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील, बंदरे खनिज कल्याणमंत्री ना.दादाजी भुसे, खा.डॉ.हिना गावीत, जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत, आ.मंजुळा गावीत, माजी आ. शिरीष चौधरी, जि.प. उपाध्यक्ष सुहास नाईक, जि.प.सभापती संगिता भरत गावीत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.








