नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या मेळाव्यात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या टोलेबाजीला करीत तुम्ही तुमचा अडीच वर्षाचा व आम्ही आमचा अडीच महिन्यांचा हिशेब द्यावा आम्ही कुठे कमी पडलो असू तर सरकार पायउतार व्हायला तयार आहे, असे आव्हान दिले.
यावेळी पुढे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, राज्यात सध्या अफवांचे पिक सुरू आहे.इंग्रजांच्या काळात एक अफवांसाठी एक खाते होते तसेच सध्या राज्यात काम सुरू आहे. ४० पैकी २२ आमदार संपर्कात आहेत, शिंदे साहेबांबरोबरच गेलेले आमदार नाराज आहेत.
उद्योग गुजरातमध्ये जात आहेत. शेतकर्यांकडे लक्ष नाही, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. अफवा पसरवणार्यांना माझे खुले आव्हान आहे, एकाच व्यासापिठावर येवून अडीच वर्षाचा व अडीच महिन्यांचा हिशेब द्यावा, आम्ही कुठे कमी पडलो असू तर सरकार पायउतार व्हायला तयार आहे, असे आव्हान दिले.
हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. आम्ही आयुष्याची ३५ वर्षेत शिवसेनेत घालवली आहेत. गावापाडयात शाखा काढल्य आहेत. आणि हे सांगतात आम्ही शिवसेनेशी गद्दारी केली. उलट आम्ही शिवसेना वाचवण्याचाच प्रयत्न केला.आमच्यावर खोके घेतल्याचा आरोप केल्या जातो. ५० आमदार एकदम ओके आहे म्हणे आम्ही घरी बसवले माजलेले बोके असे म्हणत माझा मुंबईवाल्यांना आमचा प्रश्न आहे, तुम्हाला शिवसेनेने मोठ केले, आम्ही शिवसेनेला मोठे केले. म्हणून आमच्यावर आरोप करणार्यांनी आत्मपरिक्षण करावे, असे सांगत.
उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी उपसा सिंचन योजनांचा प्रश्न, नारपारचा प्रश्न, जलवाहिन्यांच्या प्रश्नाकडे लक्ष घातले तर निश्चितपणाने जनताही आपल्याबरोबर राहील. दोन वर्ष आपल्या हातात आहे, त्यांना कामाच्या माध्यमातून उत्तर द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.








