नंदुरबार l
शहादा तालुक्यातील लंगडी भवानी येथील शेत शिवारातून चोरट्याने सौरऊजेचे स्टाटर लंपास केले.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्याती लंगडी भवानी येथील इंदूबाई सखाराम पावरा व रतिलाला पावरा यांच्या मालकीच्या वनजमीनीच्या शेतपट्ट्यातील शेतात चोरट्यांनी प्रवेश केला.
यावेळी शेतात असलेल्या ३ हॉर्सपॉवरचे सौरऊर्जेचे ८ हजार रुपये किंमतीचे स्टाटर चोरट्यांनी लंपास केले. याबाबत इंदूबाई पावरा यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.दीपक परदेशी करीत आहेत.








