Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार व शहाद्यात दोघा महिलांच्या पर्समधून दागिने व रोकड लंपास

team by team
October 28, 2022
in क्राईम
0
ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

नंदुरबार l

 

शहरातील बसस्थानकात व शहादा बसस्थानकात बसमध्ये चढणाऱ्या दोघा महिलांच्या पर्सची चैन उघडून दोघा महिलांच्या पर्समधून सुमारे दोन लाख रुपयांचे दागिने व रोकड चोरुन नेल्याची घटना घडली.

 

 

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा येथील नुतन दिनकर मिस्तरी या नंदुरबार बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना अज्ञातांनी त्यांच्या पर्सची चैन उघडून त्यातील ४० हजार रुपये किंमतीचे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र पोत व अडीच हजार रुपयांची रोकड असा सुमारे ४२ हजार रुपये ५०० रुपये किंमतीचे ऐवज लंपास केला. याबाबत नुतन मिस्तरी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पोना.श्रीकांत माळी करीत आहेत.

 

 

 

 

 

तसेच शहादा तालुक्यातील मंदाणा येथील संदिप दगडू साळुंखे यांची पत्नी हर्षदा या अमळनेर येथे जाण्यासाठी शहादा बसस्थानक येथून शहादा-जळगाव बसमध्ये चढत असतांना अज्ञाताने त्यांच्या पर्सची चैन उघडून त्यात असलेला सोन्याचे दागिने असलेला बॉक्स चोरुन नेला. सदर बॉक्समध्ये ८४ हजार रुपये किंमतीचे २८ ग्रॅम वजनाची एक सोन्याची मंगलपोत, ४८ हजार रुपये किंमतीचे १६ ग्रॅम वजनाची एक मंगलपोत व २८ हजार ५०० रुपये किंमतीचे ५ ग्रॅम ३ ग्रॅम वजनाचे कानातले टोंगलची जोडी व दीड ग्रॅम वजनाची किल्लूची जोडी असे एकूण १ लाख ६० हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने होते. याबाबत संदिप साळुंखे यांनी शहादा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

49 वी महाराष्ट्र राज्य ज्युदो स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्याचा संघ तयार

Next Post

दौऱ्यात बदल : आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हेलिपॅडवरून थेट जाणार पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी

Next Post
पालिकेचा नूतन वास्तूचे २९ ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, जीटीपी कॉलेजवर शिंदे गटाची जाहीर सभा

दौऱ्यात बदल : आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हेलिपॅडवरून थेट जाणार पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add