नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा ज्युदो असोसिएशन यांच्या वतीने 22 ऑक्टोंबर रोजी एस.ए.मिशन स्कुल जिमखाना येथे नंदुरबार जिल्हा ज्युदो संघ निवड चाचणी चे आयोजन करण्यात आले होते.सदर निवड चाचणी मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील विविध शाळेतील खेळाडू मुला मुलींनी उस्पूर्त रित्या सहभाग घेतला.
धुळे येथे होणाऱ्या दिनांक 4 ते 6 नोहेंबर रोजी 49 वी महाराष्ट्र राज्य सबज्युनियर्स आणि कॅडेट ज्युदो स्पर्धा आणि राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्यातील ज्युदो खेळाडूं मुला मुलींचा संघ रवाना होणार आहे.
सदर विद्यार्थ्यांच्या यशस्वी कामगिरी बद्दल व पुढील ज्युदो स्पर्धेसाठी हिरा उद्योग ग्रुप चे युवा नेते प्रथमेश शिरिष चौधरी एस. ए.मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलचे पर्यवेक्षक सबस्टिन जयकर, क्रीडा शिक्षक आशिष वळवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माळी ,वेंडर पूजा जाधव, उषा राजपूत, नंदुरबार जिल्हा ज्युदो असोसिएशन चे सचिव संतोष मराठे, अध्यक्ष गणेश मराठे आदी उपस्थित होते.यावेळी एस ए.मिशन ट्रस्ट चे चेअरमन रेव्ह.जयसिंग पठारे, कार्यकारी संचालक डॉ.राजेश वळवी, मुख्याध्यापिका नुतनवर्षा वळवी यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.








