नवापूर | प्रतिनिधी
शहरालगत महाराष्ट्र-गुजरातसीमेवरील वाकीपाडा गावाजवळ आज सकाळी १०:३० ते ११ च्या सुमारास बेडकीपाडाहुन नवापूरकडे येत असतांना गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात मोटारसायकल डिव्हायडरच्या बोर्डाला जाऊन धडकल्याने
युवकाचा अपघातात मुत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंकेत रमेश गावीत (वय १८) हा आज सकाळी १०.३० ते ११ च्या सुमारास मोटार सायकल (क्र.एम. एच. ३९ पी.२४३९) ने जात असताना महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील वाकीपाडा गावाजवळ महामार्गावर गाय अचानक समोर गाय आली. गायीला वाचवण्याच्या प्रयत्न करत असताना मोटार सायकल डिव्हायडरच्या बोर्डाला जाऊन धडकला. यात अंकेतच्या छातीला जबर मार लागला. तसेच दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. अंकेत यास उपचारासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मुत्यु झाला. यावेळी मयत अंकेतचे नातेवाईक व मित्रांना आक्रोश केला.
ऐन सणासुदीत १८ वर्षीय युवकाचे अपघाती निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. नवापूर तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच असून गेल्या काही दिवसापासून अपघात होत आहेत. याबाबत रामदास सखाराम गावीत रा. बेडकीपाडा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नवापुर पोलिसांत भा.द.वि. कलम 304 (अ), 279, 337, 338, मो. वा. का. क. 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास असई गुमानसिंग पाडवी करत आहेत