तळोदा l प्रतिनिधी
पीक कर्ज घेण्यासाठी आपआपल्या कार्यक्षेत्रात दवंडी देण्यात यावी व शिबीर घेण्यात यावे.पीक योजनेबाबत एकही शेतकरी सुटू नये, शेती पूरक व्यवसायासाठी देखील कर्ज उपलब्ध करण्यात येईल, असे प्रतिपादन खा. डॉ.हिना गावीत यांनी केले.
तळोदा येथे पीक व इतर कर्ज विषयी आदिवासी सांस्कृतिक हॉल येथे खासदार डॉ हिना गावीत ,आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.या वेळी खा.डॉ हिना गावित म्हणाल्या की,
पीक कर्ज घेण्यासाठी आपआपल्या कार्यक्षेत्र मध्ये दवंडी देण्यात यावी व शिबीर घेण्यात यावे.या पीक योजनेबाबत एकही शेतकरी सुटू नये, शेती पूरक व्यवसायासाठी देखील कर्ज उपलब्ध करण्यात येईल, शिबिरात सर्वच विभागातील कर्मचारी उपस्थित राहावे, तसेच पंतप्रधान उज्वला गॅस योजना भारतात सर्वात जास्त यशस्वी झाली आहे असे सांगितले पुढे त्या म्हणाल्या की, या योजनेसाठी जनधन अंतर्गत खाते उघडणे आवश्यक आहे,तसेच मुद्रा कर्ज प्रकरण साठी सुशिक्षित बेरोजगार साठी उपलब्ध असून त्याचा लाभ तरुणांना कसा होईल या साठी प्रयत्न करावे, त्याच बरोबर स्टँड अप इंडिया या योजनेत एक कोटी चा वरती कर्ज देण्यात येतील त्यासाठी इच्छुकांनी तरुणांना प्रोत्साहित करावे. किसान क्रिडीट कार्ड योजनेबाबत जन जागृती करावी. त्यावेळी नाबार्डचे प्रतिनिधी देखील शिबीरात उपस्थित असतील, विविध योजने बाबत लाभार्थी ना योजनेची माहिती सोपी होण्याकरिता शिबीर स्थळी फलकावर ठळकपणे माहिती उपलब्ध करून द्यावी,
त्यामुळं शिबीर यशस्वी करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत, शिबिर पूर्वी आधार कार्ड,, तीन फोटो,बँक पास बुक, सातबारा उतारा सोबत आणण्यासाठी सूचना देणे आवश्यक आहे.असे खा. डॉ.हिना गावीत यांनी सांगितले.
तळोदा तालुक्यात मोड,बोरद, प्रतापुर , तळोदा,सोमावल या ठिकाणी शिबिर घेण्यात येणार आहेत
या वेळी आ. डॉ विजयकुमार गावित,डॉ सुप्रिया गावीत , सहायक जिल्हाधिकारी डॉ मैनक घोष, तहसीलदार गिरीश वखारे ,डॉ,स्वप्निल बैसाणे डॉ, कांतीलाल टाटीया,बबिताताई नाईक, यशंवत पाडवी यंशवत नाईक, विक्रम पाडवी आर, बी, सोनवणे तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले डॉ, नवले पशुधन अधिकारी जयंत देशपांडे जिल्हा मध्यवर्ती बॅंक चे निरज चौधरी,आदि उपस्थित होते,
कार्यक्रमाचे सूत्र संचलन मुकेश कापुरे यांनी केले
डॉ. विजयकुमार गावीत यांनी आवाहन करत
तहसीलदार यांनी रेशनकार्ड वेगळं करून दया जेणेकरून लाभार्थी ना अडचणी येणार नाहीत कारण की अनेक कुटुंबाकड़े वेगळं रेशनकार्ड भेटत नाही , सध्या दुष्काळ सारखी स्थिती असून शेतकरी वैतागला आहे त्या मूळ पात्र असलेल्या शेतकरी ला कर्ज तात्काळ उपलब्ध करून द्या बॅंक शाखेचा वरिष्ठांना देखील या शिबिरात बोलवा असे आवाहन या वेळी केले.