नंदुरबार l
नवापूर तालुक्यातील सोनारे दिगर येथे दुचाकीने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील सोनारे दिगर येथील रेवा हिदळा वळवी (वय ६६) हे सोनारे दिगर गावातील रोहिदास पाडवी यांच्या शेतासमोरुन पायी जात होते.
यावेळी हरीष वळवी (रा.तारापूर ता.नवापूर) याने त्याच्या ताब्यातील दुचाकी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात दुचाकी चालवून पायी जाणाऱ्या रेवा वळवी यांना जबर धडक दिली. औषधोपचारादरम्यान रेवा वळवी यांचा मृत्यू झाला. याबाबत महेंद्र रेवा वळवी यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात हरीष वळवी याच्याविरोधात भादंवि कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बळवंत कोळी करीत आहेत.








