नवापूर l प्रतिनिधी
गरजूंची दिवाळी आनंददायी होण्यासाठी येथील पोलीस प्रशासनातर्फे गोरगरीबाना फराळ वाटप करण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या संकल्पनेतून नवापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील, नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी, वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी यांच्या विशेष सहकार्यातून नवापूर शहरातील गोरगरीब ब कुटुंबातील नागरिकांसोबत दिवाळी साजरी करत पोलिसांनी सामान्य नागरिकांच्या मनातील पोलिसांसोबत ची भीती दूर करत एक मैत्रीचा गोडवा निर्माण केला.

नवापूर शहरातील सामान्य नागरिकांच्या वसाहतीत स्वतः जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी पो हे का निजाम पाडवी,पंकज सुर्यवंशी,दिनेश वसुले,विकी वाघ,नामदेव राठोड,रणजीत महाले,प्रशात खैरणार,किशोर वळवी यांनी दिवाळीच फराळप्रदान करत उत्सवात गोडवा निर्माण केला.पोलिसांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.








