नंदूरबार l प्रतिनिधी
नाशिंदा ता. नंदुरबार येथे श्री पावभा ऋषीची यात्रा आज २४ ऑक्टोबर २२ सोमवार रोजी सालाबाद प्रमाणे भरणार आहे.
दोन वर्षापासून शासनाच्या आदेशानुसार कोविडमुळे यात्रा बंद होती. यावर्षी यात्रेस शासनाची परवानगी असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. नवसाला पावणारे श्री पावभा ऋषी म्हणून सर्वत्र ख्याती असल्याने दर्शन, नवस फेडीसाठी नंदुरबार सह धुळे, जळगाव जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने येतात. अस्तंबा ऋषी चे दर्शन घेऊन भावीक श्री पावभा ऋषी व राजबाईच्या दर्शनासाठी येथे येतात तिनही जिल्ह्यातील भगत( सेवकरी)येथे रात्रभर थांबून डांक्याख्या तालावर आपल्या साथीदारासह श्री पाव ऋषीच्या जीवनाचापट नाचत ओव्या रुपात गाऊन रात्रभर जागरण करतात.
या ओव्यात श्री पावभा ऋषीच्या जीवनातील प्रसंगांचा उल्लेख असल्याने भाविक मोठ्या संख्येने रात्रीही येथे हजेरी लावतात. रात्रभर श्री पावभा ऋषीच्या मंदिर परिसरात श्री पावभा ऋषीच्या नावाच्या जय जय काराने वाजंत्रीने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. सकाळपासूनच भाविकांची दर्शन व नवस फेरीसाठी गर्दी होते. यात्रेत लहान मोठे पाळणे, हलवायांचे, खेळण्याचे, पूजाचे साहित्य व नारळाचे दुकाने यात्रेत दाखल झाली आहेत. संस्थान तर्फे मंदिराचे मंदिराची रंग रंगोटी विद्युत रोशनाई आदी कामे पूर्ण झाली आहेत.
श्री पावभा ऋषी व राजबाई संस्थान नाशिंदे यांनी मंदिर परिसरात भाविकांसाठी विविध सोयी उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती संस्थांचे अध्यक्ष श्री छबिलाल श्रीराम पाटील उपाध्यक्ष व्यंकट टिकाराम पाटील. श्री पावभा ऋषी व राजबाई यांच्या यात्रेत दर्शन, भंडारा व नवस फेडी चा लाभ घेण्याची आव्हान संस्थान तर्फे करण्यात आले आहे.








