Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एक लाख पद भरतीस मान्यता: पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

team by team
October 23, 2022
in राजकीय
0
एक लाख पद भरतीस मान्यता: पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित
नंदूरबार l प्रतिनिधी
योजनांची प्रभावी अमंलबजावणी व्हावी यासाठी येत्या मार्च २०२३ पर्यंत सुमारे एक लाख पदांची भरती करण्यात येणार असल्याचे राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी सांगितले.
नंदुरबार जिल्हा परिषदेतील नवनियुक्त अध्यक्षांच्या दालनाच्या पुजेनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री डॉ.गावीत म्हणाले, रिक्त पदांचा प्रश्­न नंदुरबार जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात आहे. यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने डिसेंबरपर्यंत एक लाख पदे भरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही अडचणी आल्याने आता मार्चपर्यंत सुमारे १ लाख जागा भरल्या जातील. त्यामुळे रिक्त असलेली ८० ते ९० टक्के पदे भरले जातील. यामुळे जिल्ह्यातील रिक्त पदेदेखील भरली जाणार आहेत.
केंद्रासह राज्यातुन विकासासाठी जिल्ह्यात किती पैसा येतो, त्यापेक्षा योग्य नियोजन करुन खर्च करणे अपेक्षित असल्याचे यावेळी डॉग़ावित म्हणाले. आगामी काळात येणाऱ्या निधीत दऱ्या-खोऱ्यातील, वाड्या वस्तीतील रस्ते या कामांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्ह्यात शेतकरी, बेरोजगार, बचत गटांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यासोबत जिल्ह्यात बांबू ,तेंदूपत्ता आदी उत्पादनाबाबत सर्वेक्षण केले जात असून जिथे पिकते तेथेच प्रोसेसिंग युनिटची स्थापना करण्याचा प्रयत्न आहे.
त्यामुळे स्थलांतराचे प्रमाण कमी होणार आहे. जिल्ह्यात ९० टक्के स्थलांतर हे सिंचनाअभावी होतांना दिसत आहे. त्यासाठी सिंचनासाठी प्रयत्न करणार असून जिल्ह्याचे प्रश्­न सोडविण्यासाठी प्रत्येक भागात काय हवे यासाठी प्रत्येक गावांचा आराखडा आखला जात असल्याचे मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी सांगितले.
बातमी शेअर करा
Previous Post

सर्व पक्षांच्या सदस्यांना सोबत घेवुन जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध : जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित

Next Post

कुपोषण रोखण्यासाठी स्थलांतरीतांचे मॅपिंग होणार: खा.हीना गावित

Next Post
सर्व पक्षांच्या सदस्यांना सोबत घेवुन जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध : जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित

कुपोषण रोखण्यासाठी स्थलांतरीतांचे मॅपिंग होणार: खा.हीना गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add